सायंकाळी गच्चीत उभं राहून आकाश न्याहाळताना
विश्वातल्या सर्वांत प्रतिभावंत चित्रकाराने आकाशाच्या कॅनव्हासवर केलेली
रंगांची मनसोक्त उधळण पाहताना
कातरवेळेचा तो स्वप्नवत सोनेरी प्रकाश
पाखरांचे घरट्याकडे परतणारे थवे
पश्चिमेच्या वार्याने जणु फुंकर घालावी
आणि अंगभर एकदम शहारा यावा
तसा सायंकाळचा तो गार वारा
शरीराचा सारा थकवा निघून जावा
मनातल्या सर्व विचारांचे ओझे गळून पडावे
आणि दिवस मावळताना
तो मनाला एक वेगळीच हुरहूर लाऊन जावा
-वीरेंद्र देशपांडे २००५
वाचव देवा
6 days ago

0 comments:
Post a Comment