पाऊस हा स्वत: ओलाच असावा
पण त्याला त्याची जाणीव नसावी
तो तर धरणीला बिलगायला आतुर असवा
तिच्या उबदार कुशीत शिरायची ओढ असावी
पण जेव्हा तो बघतो वेडे प्रेमी
त्याचीच वाट पाहताना, चिंब भिजताना
त्याची प्रेयसी धरणीहि त्याचीच वाट बघताना
तेव्हा त्याला कळते पावसात भिजायची मजा काय
म्हणून मग पाऊस सर्वांना भिजवतो
भिजवताना स्वत: मात्र कोरडाच राहत असावा
मग तो उजेड देणारी पणती बघतो
तिच्या खाली मात्र त्याला अंधारच दिसतो
त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळते
आपल्या अस्तित्वाचा अर्थ त्याला कळतो
म्हणुनच तो इतरांसाठी जगतो
म्हणून पाऊस सर्वांना चिंब भिजवतो
-वीरेंद्र देशपांडे २००८

3 comments:
पाऊस हा स्वत: ओलाच असावा
पण त्याला त्याची जाणीव नसावी
तो तर धरणीला बिलगायला आतुर असवा
तिच्या उबदार कुशीत शिरायची ओढ असावी
----
धरणीचा विरह कदाचित त्याला सहन होत नसावा..
त्याच्या सरीत एखादा त्याचा अश्रूही झरत असावा..
पाऊस हा स्वत: ओलाच असावा
पण त्याला त्याची जाणीव नसावी
तो तर धरणीला बिलगायला आतुर असवा
तिच्या उबदार कुशीत शिरायची ओढ असावी
----
धरणीचा विरह कदाचित त्याला सहन होत नसावा..
त्याच्या सरीत एखादा त्याचा अश्रूही झरत असावा..
"धरणीचा विरह कदाचित त्याला सहन होत नसावा..
त्याच्या सरीत एखादा त्याचा अश्रूही झरत असावा.."
वा! छान आहेत ओळी.
thanks
Post a Comment