Sunday, June 29, 2008

रांधायला

साहित्याच्या कढईत मी
नुसतंच सोडतोय शब्दांचं पीठ
चाखून बघायला वेळ नाही
कमी-जास्त आहे का मीठ

खमंग खरपूस वर थर
आत गरम तिखट ओवा
शब्द चांगले तळले वर
म्हणे आत अर्थाचा मेवा

सोडता-सोडता सुटतात शब्द
सारेच होतात मुक्तछंद
नवकवितेच्या नावाखाली
वेडीवाकडी करपलेलीही खपली

चहाच्या गरम घोटाबरोबरच
कवितेचा आस्वाद घ्यावा
तशी नुसती नाहीच मजा
आणि हवी पावसाळी हवा

कवितेबरोबच देतो
तळल्यानंतर खाली उरलेले
स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, चारोळ्या
छान खरपूस लागतात हो! ... म्हणे

कवितेचे असे हे घाणे टाकून
स्वत:ला कवी म्हणवून कंटाळा आलाय
म्हणून पंचपक्वान्नाच्या स्वयंपाकासारखी
रांधायला शिकायची आहे मला कविता

- वीरेंद्र देशपांडे २००८

5 comments:

-नाम गुम जायेगा said...

वाह विरेंद्र,
एकदम खमंग कविता.
पचायला जड आहे थोडी.
पण चव घ्यायला हरकत नसावी.

सुरेश शिरोडकर said...

वाह विरेंद्र,
खमंग कविता.

मार्गस्थ उषेचा said...

वीरेंद्र... mast jamliiii kavitaa...

ulhasbhide said...

रांधायला
“कवितेचे असे हे घाणे टाकून ….”

“स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, चारोळ्या
छान खरपूस लागतात हो! ... म्हणे “

तथाकथित कवितांबद्दल छान उपहास … :D
या बाबतीत आपली मत जुळतात अस जाणवत.

ulhasbhide said...

विरेंद्र
‘मराठी मंडळी’ वर तुमचा blog दिसला ...
सहजच बघितला आणि लिखाणात सहजता जाणवली.
तुमच्याशी संपर्क करण्याची इच्छा आहे.
तुमच्या blog वरच्या ’email’ ला click केल्यावर
computer hang झाला म्हणून mail करू शकलो नाही.
माझा mail-id देतोय त्यावर तुम्ही dumy mail केल्यास
मला तुमचा id मिळून संपर्क करता येईल.
माझा देखील छोटासा blog आहे. जमल्यास visit करावा.
http://www.ulhasbhidesanchit.blogspot.com/

mail-id ulhasbhide@gmail.com

…. उल्हास भिडे(५८)
..... बोरिवली - मुंबई