Sunday, December 6, 2009

अजूनही!

मला सोडताना तू दिलेली लाली तशीच माझ्या ओठी
अजूनही तुझ्याच मिठीची ऊब झगडतेय या थंडी पावसाशी

तू दिलेल्या मोगर्‍‍याच्या कळ्या ओंजळीत ठेऊन मी भिजतोय
तुझीच ओढणी लपेटून मी अजूनही तिथंच बसलोय

अजूनही माझ्या श्वासाश्वासात तुझाच उष्ण श्वास
रंध्रारंध्रातून तुझीच आस, पावलोपावली तुझाच भास

माझा रस्ताच थांबलाय त्या वळणावर, अन बुध्दी थिजलिये
ठोकाच चुकलाय त्या समेवर, पण अजूनही मन वेडं गातंय तुझीच गाणी

आता मला माझं नाव आठवत नाही, मला माझं गाव आठवत नाही
पण अजूनही आठवते आहेस ती, फक्त तू! ... फक्त तूच!

- वीरेंद्र देशपांडे ०६/१२/२००९

0 comments: