Friday, June 25, 2010

सहजच

जशी प्रकाशाने सावली, पाण्यात प्रतिबंबे
तसे सहजच कळ्ती, एकमेकांचे मनसुबे

तव मुखचंद्र पुनवेचा, मज मनात भरती
तू घेता उंच झोका, मज जीव खाली वरती

तू भिजता पावसात, मी चिंब चिंब होतो
तू फिरता वार्‍यावर, मी शहारुन जातो

तू मनी गुणगुणले, कुजबुज ये मज कानी
जे भाव तुज मनी, ते काव्य मज पानी

तू झोपल्यावरच, माझा डोळा मिटतो
स्वप्नं तुला पडता, मी दचकून उठतो

तव चरण जळात, तरंग मज मनात
मेंदी तव हातास, रंग मज स्वप्नास

तू मिरची खाता, ठसका मज लागतो
तिथे पाऊस पडता, इथे मोर नाचतो

- वीरेंद्र देशपांडे २५/०६/२०१०

3 comments:

balkrishna said...

faarch chhan kavita !

prabhakar said...

वा फारचं छान. मला ब्लॉग साठी आपली मदत पाहिजे. करु शकाताल काय?

Veerendra Deshpande said...

thanks balkrishna & prabhakar... ब्लॉगसाठी काय मदत हवी आहे? मला शक्य ती मदत जरुर करेन.