Monday, January 24, 2011

जीवन संगीत

जश्या लाटा क्षितिजापासून सळसळत तुटत फुटत किनार्‍यापर्यंत येतात, तश्याच मागे जातात. जाताना वाळूत उमटलेल्या पाऊलखुणाही पुसून जातात. रात्रीच्या चांदण्यात खळखळणार्‍या लाटांच्या आवाजात किनार्‍यावर फिरताना, वाळूत बसून सूर्योदय सूर्यास्ताचे रंग मनात उतरवताना, एकट्याने हे भोगताना, सारं स्रुष्टीसौंदर्य देखिल अंगावर आल्यासारखं वाटतं. एकांत हे वरदान तर एकाकीपणा हा शाप. जसे एकटाच स्वर संगीत निर्माण करु शकत नाही; तसे किनार्‍यावरुन चालताना आपल्या दोन पावलांना अजून दोन पावलांची साथ मिळते तेव्हाच मनोरुपी जीवनावाद्याच्या तारा छेडल्या जातात व त्यातून जीवन संगीताची निर्मिती होते.

वी.सु.देशपांडे
०१/०२/२०११ पुणे.

1 comments:

Veerendra Deshpande said...
This comment has been removed by the author.